लाचखोर आरोग्य निरीक्षक पुंड कारागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 01:47 AM2018-02-15T01:47:01+5:302018-02-15T01:47:09+5:30
अकोला : महापालिकेतील एका कर्मचार्याला हजेरी प्रमाणपत्र देण्यासाठी सुमारे चार हजार रुपयांची लाच मागणार्या महापालिकेचा आरोग्य निरीक्षक सुरेश रामराव पुंड याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केल्यानंतर गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, लगेच जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला होता. सायंकाळपर्यंत या जामीन अर्जावर सुनावणी झाली नव्हती.
लोकमत न्यूज नेटवर्क

महापालिकेच्या एका ३२ वर्षीय कर्मचार्याला वेतन मिळण्यासाठी हजेरी प्रमाणपत्राची आवश्यकता होती. हे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार असलेला आरोग्य निरीक्षक सुरेश रामराव पुंड (४९) रा. निबंधे प्लॉट, लहान उमरी याने कर्मचार्यास हजेरी पत्रक देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागि तली; मात्र तक्रारकर्त्याला लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. यावरून अकोला लाचलुचपत प्र ितबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले यांनी १२ फेब्रुवारीला पंचासमक्ष पड ताळणी केली असता त्यामध्ये आरोग्य निरीक्षक सुरेश पुंड याने लाच मागि तल्याचे सिद्ध झाले.
त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सुरेश पुंड याने लाच स्वीकारताच सापळा रचून असलेले एसीबीच्या अधिकार्यांनी त्याला रंगेहाथ अटक केली. त्यानं तर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.