अकोला: देशी बीटी कपाशीची गरज निर्माण झाली असून, बीटीचे उत्पादन वाढविणार आहोत. पुढच्या वर्षी बीजी-२ चे साडेतीन लाख पाकीट शेतकऱ्यांना उपलब्ध करू न देणार असल्याचे प्रतिपादन महाराष्टÑ राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांनी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने पीकेव्ही हाय-२ बीजी-२ कपाशीचे नवीन संकरित वाण विकसित केले. या वाणाचे २४ जून रोजी कमिटी सभागृहात सकाळी ११ वाजता डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांची प्रमुख उपस्थिी होती. तसेच कृषी विद्यापीठाचे डॉ. विलास खर्चे, डॉ. दिलीप मानकर, महाबीजचे सुरेश पुंडकर, प्रफुल्ल लहाने, प्रकाश ताठर यांची उपस्थिती होती.याप्रसंगी बोलताना भंडारी यांनी देशी बीटी उत्पादनाचा आराखडा व गरज यावर विवेचन केले. तसेच डॉ. पंदेकृवि व महाबीज मिळून आणखी नवीन बीजी-२ विकसित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. डॉ. भाले यांनी बीजी-२ वाण रसशोषण कीड व बोंडअळीला प्रतिकारक असून, शेतकºयांच्या पसंतीत उतरणार असल्याचे सांगितले. उपस्थितांनी पीकेव्ही हाय-२ दोन वाण १९८०-९० च्या दशकात लोकप्रिय असल्याचे सांगितले. तथापि, बीटी कपाशीचा प्रवेश झाल्याने हे वाण मागे पडले होते. कार्यक्रमाला घुसर, सांगळूद, पुनोती, म्हैसांग, अळोशी कळोसी तसेच बोरगाव मंजू येथील शेतकºयांची उपस्थिती होती. दयाराम पागृत, यश पागृत, गोवर्धन काकडे, पांडुरंग गायकी, शेख खुर्शीद आदी शेतकºयांनी बीजी-२ शेतात लावण्याची तयारी केली. संचालन डॉ. आम्रपाली आखरे यांनी केले. कार्यक्रमाला महाबीजचे विभागीय व्यवस्थापक बी.जी. लुले, कृषी विद्यापीठाचे डॉ. डी.टी. देशमुख, डॉ.आर.एन. काटकर, डॉ.पी. डब्ल्यू नेमाडे, डॉ.एस.बी. देशमुख, डॉ.व्ही.व्ही. देशमुख, ओ.एस. राखोंडे, गोदावरी गायकवाड,आर.टी. भोवते यांची उपस्थिती होती.