अकोला : रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष चौक ते तेलीपुरा चौक या दरम्यान असलेली एक जीर्ण इमारत कोसळण्याची घटना मंगळवारी रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान घडली. या इमारतीखाली दबल्याने जानकी रामजी चोपडे यांच्या कुटुंबातील चार जण जखमी झाले असून कल्पना चोपडे नामक महिला रात्री उशिरापर्यंत ढि गाकाऱ्या खाली खालीच दाबून होती.
तेलीपुरा चौकामध्ये जानकी रामजी चोपडे यांचे क्लास यांचे कुटुंबीय वास्तव्यास असून त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी कल्पना ताई चोपडे त्यांचा मोठा मुलगा मंगेश चोपडे मंगेश चोपडे यांची पत्नी सुनीता चोपडे व लहान भाऊ योगेश चोपडे हे रहिवासी आहेत. मंगळवार मंगळवारी रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान जानकीराम चोपडे यांचे कुटुंबीय भोजन केल्यानंतर घरात बसलेले असताना त्यांचे दोन मजली असलेली इमारत अचानक कोसळली तीन आणि सिमेंटच्या 2 साहित्यामध्ये बांधलेली ही इमारत जीर्ण झाल्यामुळे मंगळवारी उशिरा रात्री कोसळली ही इमारत कोसळल्यामुळे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली कल्पना चोपडे यांच्यासह पूर्णपणे कुटुंबीय होते. पोलीस अधिकारी अधिकारी कर्मचारी आणि आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले त्यामुळे जानकीराम चोपडे मंगेश चोपडे त्यांच्या पत्नी सुनीता चोपडे ंगेश चा लहान भाऊ योगेश चोपडे यांना ढिगार्याखालून बाहेर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले तर जानकीराम चोपडे यांच्या पत्नी कल्पना चोपडे ह्या ढिगाऱ्याखाली दबून असून दोन तासांपासून त्यांना बाहेर काढण्याचे कार्य मोठ्या ताकदीने सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख ठाणेदार शेख ठाणेदार विलास पाटील ठाणेदार ठाणेदार सपकाळ सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांचे ठाणेदार अनिल चुंबळे स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी घटनास्थळ गाठून जखमींवर उपचार केले यासोबतच परिसरातील नागरिकांनी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली काही वेळातच महापालिकेची जेसीबी घटनास्थळावर बोलावण्यात आली. मात्र कोसळलेली इमारत मोठ्या इमारतींच्या आत मध्ये असल्याने सदर जागेवर जेसीबीने प्रचंड अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे उचलण्याचे काम मानवांकडून करण्यात आले यामध्ये प्रचंड वेळ गेल्याने कल्पना चोपडे यांची प्रकृती कशी आहे यासंदर्भात माहिती समोर आली नाही.