बांधकाम साहित्य उठले जीवावर; अकोलेकरांना वैताग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 06:50 PM2020-03-11T18:50:30+5:302020-03-11T18:50:41+5:30
सर्वसामान्यांच्या जीवाला सुरक्षित करण्यासाठी प्रशासन पुढाकार का घेत नाही,असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
अकोला: इमारतींचे बांधकाम करताना थेट रस्त्यावर तसेच सार्वजनिक जागेवर बांधकाम साहित्य टाकून अकोलेकरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या मालमत्ताधारकांना महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी रस्त्यावरील बांधकाम साहित्य हटविण्याचा गर्भीत इशारा दिला होता. हा इशारा उलटून गेला असला तरी मनपाच्या स्तरावर आजपर्यंत ना बांधकाम साहित्य जप्त करण्यात आले ना मालमत्ताधारकांना दंड बजावण्यात आला. दंडात्मक रकमेच्या माध्यमातून मनपाच्या तिजोरीत आर्थिक भर घालण्यासोबतच सर्वसामान्यांच्या जीवाला सुरक्षित करण्यासाठी प्रशासन पुढाकार का घेत नाही,असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शहराच्या कानाकोपºयात विविध इमारतींचे बांधकाम जोरात सुरू आहे. बांधकाम करताना संबंधित मालमत्ताधारकांकडून विटा, रेती, गिट्टी, लोखंड तसेच इतर साहित्य ठेवण्यासाठी थेट रस्ते किंवा सार्वजनिक जागेचा वापर केला जात आहे. नगररचना विभागाच्या नियमानुसार बांधकाम साहित्य उघड्यावर ठेवता येत नाही. मालमत्ताधारकाने खासगी मालमत्तेवर आवारभिंत उभारून त्यामध्ये साहित्य ठेवणे अपेक्षित आहे. महापालिकेच्या नियमांची ऐशीतैशी करीत बांधकाम करणाऱ्यांनी चक्क रस्त्यांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे संबंधित परिसरातून वाहतूक करणाºया वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेल्या रेती, गिट्टीमुळे वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत. संबंधित मालमत्ताधारकाला हटकल्यास किंवा सूचना केल्यास त्यांच्याकडून अरेरावीची भाषा केली जाते. याप्रकरणी महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे पाहून रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. हा प्रकार लक्षात घेता मनपाने रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणाºया मालमत्ताधारकांना दंड बजावण्याचा निर्णय घेतला होता. आजपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, हे विशेष.
महसुलात वाढ का नाही?
अकोलेकरांनी मालमत्ता कराची थकबाकी जमा करण्यास हात आखडता घेतल्याची परिस्थिती असून, यामुळे मनपा कर्मचाºयांच्या थक ीत वेतनाची समस्या पुन्हा निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी रस्त्यांवर बांधकाम साहित्य ठेवणाºया मालमत्ताधारक, बांधकाम व्यावसायीकांकडून मनपा दंडात्मक रक्कम का वसूल करीत नाही,असा प्रश्न उपस्थित होत आहे.