बुलडाणा शहरात घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 03:54 PM2019-07-31T15:54:10+5:302019-07-31T15:54:30+5:30
सध्या शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्यामुळे घाण पसरल्याचे दिसून येत आहे. कचरा व घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची जास्त भीती असते. त्यामुळे डॉक्टर आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देतात. सध्या शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्यामुळे घाण पसरल्याचे दिसून येत आहे. कचरा व घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरात सहज चक्कर मारल्यास बºयाच ठिकाणी कचरा साचल्याचे दिसून येते. चिखल व कचºयामुळे घाणीचे प्रमाण वाढले आहे. तर नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचरा कुंडीत कचरा टाकणे आवश्यक असतांना अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला कचरा टाकलेला आहे. मोकाट जनावरे, डुक्कर कचºयाची नासधूस करतात. रस्त्यावर व इतरत्र कचरा पसरवतात. पावसाच्या पाण्यामुळे कचरा ओला होतो अन सर्वत्र घाण पसरते. शहरातील संगम चौक ते जांभरुण रोडवरील अतिक्रमण काही दिवसांपूर्वी पालिकेने काढले होते. परंतू आता या रस्त्यावर अनेक ठिकाणी दुकाने लावली जात आहेत. तर संगम चौकाला लागून रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचºयाचा ढीग साचला आहे. कचºयामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. रस्त्याने येणाºया जाणाऱ्यांना यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागतो. कचरा व घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.