शेतातील जलसिंचन साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:20 AM2021-04-23T04:20:44+5:302021-04-23T04:20:44+5:30
येथील अल्पभूधारक शेतकरी सैयद मजहर अली यांची बोरगाव मंजू शिवारात शेती आहे. सै. मजहर अली हे अल्पभूधारक शेतकरी असून ...
येथील अल्पभूधारक शेतकरी सैयद मजहर अली यांची बोरगाव मंजू शिवारात शेती आहे. सै. मजहर अली हे अल्पभूधारक शेतकरी असून शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. गत काही वर्षांपासून सततची नापिकी, अवेळी व अपुरा पाऊस झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाला आहे. अशातच, अचानक शेतात ठेवलेल्या जलसिंचनाच्या ठिबक सिंचन साहित्याला (किंमत अडीच लाख रुपये) अचानक आग लागून राखरांगोळी झाली. शेतकरी व परिसरातील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; परंतु पाणी नसल्याने आगीत ठिबक सिंचन साहित्य व नळ्या जळून खाक झाल्या. घटनेची फिर्याद शेतकरी सैयद मजहर अली यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात व महसूल विभागाकडे केली असून, नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
फोटो: मेल फोटोत