पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सहा दिवसांत मागितला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 11:58 AM2019-11-02T11:58:41+5:302019-11-02T11:58:46+5:30
पीक नुकसानाचा अंतिम अहवाल ६ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : परतीच्या पावसाने जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यानुषंगाने पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सहा दिवसांत (६ नोव्हेंबरपर्यंत) सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी (बीडीओ) व तालुका कृषी अधिकाऱ्यांना शुक्रवार, १ नोव्हेंबर रोजी दिला.
पावसाळा संपल्यानंतर सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन व ज्वारीचे पीक सडले असून, कोंब फुटले आहेत. तसेच वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने गत जुलै ते आॅक्टोबर अखेरपर्यंत अतिवृष्टी, पूर व परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सेवकांच्या पथकांद्वारे गत ३० आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहेत. पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून, पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून, पीक नुकसानाचा अंतिम अहवाल ६ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदार, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाºयांना दिला.
पीक नुकसानाचे अर्ज घ्या; पथकांना निर्देश
पीक विमा काढलेल्या शेतकºयांकडून पीक नुकसानाचे सूचना अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात येत आहेत; मात्र पीक नुकसानाचे सूचना अर्ज शेतकºयांना सादर करणे सोयीचे व्हावे, यासाठी पीक नुकसानाचे पंचनामे करणाºया तलाठी, ग्रामसेवक व कृषी सेवकांच्या पथकांनी गाव पातळीवरच शेतकºयांकडून पीक नुकसानाचे सूचना अर्ज घ्यावे, असे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अंतिम अहवाल ६ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील तहसीलदार, ‘बीडीओ’ व तालुका कृषी अधिकाºयांना दिला आहे. तसेच पीक विमा काढलेल्या शेतकºयांकडून पीक नुकसानाचे सूचना अर्ज पंचनामे करणाºया पथकांनी स्वीकारण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
-संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी.