उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे झाडांची पाण्याची पातळी कमी होऊ नये, झाड कोमेजू नये, यासाठी वृक्षमित्र परिवाराकडून श्रमदानातून सर्व झाडांना टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहे. यासाठी विजय कुलट, आरती कुलट, अंकिता कुलट, स्वराज कुलट, ऋषी कुलट, गोलू कुलट, सचिन कुलट, ओम कुलट, हर्षल कुलट, पवन बायस्कार, प्रणव वसू, सुज्वल कुलट आदी सदस्य मंडळी मोठ्या संख्येने श्रमदानात सहभागीही होत आहेत. या छोट्याशा उपक्रमाकरिता निखिल कुलट यांनी ट्रॅक्टर आणि पवन बायस्कर यांनी टँकर उपलब्ध करून दिला आहे.
--------------------------------------
महिला दिनाला कष्टकरी आदिवासी भगिनींचा सत्कार!
अकोट : जागतिक महिलादिनी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका प्रा. माया अतुल म्हैसने यांनी राहनापूर येथील आदिवासी महिलांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहनापूर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना डाबेराव-चव्हाण होत्या. संचालन अश्विन हिंगणकर, प्रास्ताविक धामेचा, तर आभारप्रदर्शन चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला शाळा समिती अध्यक्ष रमेश कोरेलवा, शिवसेना उपजिल्हा संघटिका उषा गिरणारे, कार्तिक सुरत्ने, विठ्ठल नागरगोजे, प्रिया हिंगणकर, सकिना पालवे, अनुबाई कोरलावा, गंगुबाई काकडे, जानकी ढिगार, बळीबाई सकोम आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------
‘सावित्रीबाई फुले यांचे विचार अंगीकारावे!’
अकोट : स्थानिक श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य विलास रोडे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले.