मिकसोपॅथीचा निर्णय रद्द करा; आयएमएच्या धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:14 AM2020-12-09T04:14:06+5:302020-12-09T04:14:06+5:30

या अधिसूचनेत आयुर्वेद विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देऊन त्यांचा वापर भारतीय रुग्णांवर स्वतंत्रपणे करण्याचे धोरण आहे. हे मिकसोपॅथीचे धोरण रद्द ...

Cancel the decision of myxopathy; IMA's dam | मिकसोपॅथीचा निर्णय रद्द करा; आयएमएच्या धरणे

मिकसोपॅथीचा निर्णय रद्द करा; आयएमएच्या धरणे

Next

या अधिसूचनेत आयुर्वेद विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देऊन त्यांचा वापर भारतीय रुग्णांवर स्वतंत्रपणे करण्याचे धोरण आहे. हे मिकसोपॅथीचे धोरण रद्द करण्यासाठी आयएमएच्या वतीने राष्ट्रीय आयएमएच्या मार्गदर्शनात मंगळवारी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत महानगरात ठिकठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन राबविले. कौन्सिल जोपर्यंत हा निर्णय रद्द करीत नाही तोपर्यंत हा लढा केंद्रित आयएमएच्या मार्गदर्शनात सुरू राहणार असल्याचे अकोला आयएमएचे अध्यक्ष कमलकिशोर लढ्ढा यांनी सांगितले. आयएमएचा आयुर्वेदला विरोध नसून, मात्र तुलनात्मकदृष्ट्या आयुर्वेद व ॲलोपॅथीच्या शैक्षणिक व्याख्येत अनेक विरोधाभास असून ॲलोपॅथीमध्ये सर्जरी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक पायरीवर या सर्जनचे कठोर परीक्षण केल्या जाते. यातील कोणत्याही पातळीवरील परिपूर्णता नसणारी व्यक्ती रुग्णाला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकत नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. धरणे आंदोलनात यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. कमलकिशोर लड्ढा, उपाध्यक्ष डॉ. अनुप कोठारी, सचिव डॉ. अमोल केळकर, डॉ. प्रवीण पाटील, डोईफोडे, कोषाध्यक्ष डॉ. रणजित देशमुख, डॉ. महेंद्र काळे, डॉ. रघुवंशी, डॉ. सोमाणी, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. अभिषेक भागवत, डॉ. रवींद्र तेलकर, डॉ. शशिकांत मोरे,डॉ.के. के. अग्रवाल, डॉ. पराग महेश्वरी, डॉ. सतेन मंत्री, डॉ. नयना तेलकर, डॉ. गजानन भगत, डॉ. श्रीराम लाहोळे, डॉ.आर. जी. डेहेनकर, डॉ. योगेश वर्गे, डॉ. मीनाक्षी मोरे, डॉ. निर्मला रांदाड, डॉ. किरण गुप्ता समवेत बहुसंख्य वैद्यकीय वर्ग उपस्थित होता.

Web Title: Cancel the decision of myxopathy; IMA's dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.