जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण आणि इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण या लेखाशीर्षकी जिल्हा परिषदकडे दायित्व शिल्लक नसताना दायित्वापोटी निधी कमी करण्यात आला आहे. ही बाब जिल्हा परिषदेसाठी अन्यायकारक असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या पुस्तिकामध्ये नमूद करण्यात आलेले दायित्व रद्द करुन मूळ नियतव्यय मंजूर करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, सदस्य पुष्पा इंगळे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
............................
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण आणि इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरणाच्या कामांसाठी मंजूर निधीमधून जिल्हा परिषदेकडे दायित्व शिल्लक नसताना, दायित्वापोटी १० कोटी ६३ लाख रुपयांच्या निधीची कपात करण्यात आली आहे. ही बाब जिल्हा परिषदेवर अन्याय करणारी असल्याने, दायित्व रद्द करुन संबंधित कामांसाठी मंजूर मूळ नियतव्यय मंजूर करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.
-ज्ञानेश्वर सुलताने, गटनेता, सत्तापक्ष, जिल्हा परिषद.