पातूर परिसरात गुरे चोरणारी टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:09 AM2021-01-24T04:09:11+5:302021-01-24T04:09:11+5:30
------------------------------- खानापूर मार्गावर साचले पाणी पातूर : शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चौकाचे बाजूला खानापूर मार्गावर नालीचे पाणी साचल्याने ...
-------------------------------
खानापूर मार्गावर साचले पाणी
पातूर : शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चौकाचे बाजूला खानापूर मार्गावर नालीचे पाणी साचल्याने वाहनधारकांना ये-जा करताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे. (फोटो)
---------------------------------
उघड्यावर मांसविक्री; आरोग्य धोक्यात!
आगर : येथील वार्ड क्रमांक एकमध्ये रस्त्यालगत मांसविक्री केली जात आहे. रस्त्यावर घाण फेकल्या जात असल्याने, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे लक्ष देऊन गावात स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी होत आहे.
-------------------------------------
आगर येथील ‘त्या’ कुटुंबाला मदत
आगर: येथील गजानन अलोट यांनी ७ डिसेंबर रोजी कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आमदार नितीन देशमुख यांनी अलोट यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले, अलोट परिवाराला आर्थिक मदत म्हणून दहा हजारांची मदत दिली. यावेळी शिवसेना नगरसेवक राजेश मिश्रा, युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे, पंचायत समिती सदस्य भास्कर अंभोरे आदी उपस्थित होते.
-------------------------------------
वाडेगावात अवैध गुटखाची विक्री जोरात
वाडेगाव : बाळापूर पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या पोलीस चौकी वाडेगाव परिसरात गत अनेक दिवसांपासून अवैध गुटखा विक्री जोरात सुरू आहे. अनेक युवका व्यसनाधीन होत असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
-----------------------------------
सोनुना-पांढुर्णा रस्त्याचे काम होणार सुरू
पांढुर्णा : परिसरातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने, नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रास होत होता. अखेर सोनुना-पांढुर्णा रस्त्याच्या कामासाठी १.५ कोटी रुपये मंजूर झाल्याने, या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.
---------------------------------------------------
वाडेगाव-देगाव रस्त्याचे काम निकृष्ट
वाडेगाव : गत महिन्यांत रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, सद्यस्थित रस्त्यावर खड्ड्यांमधून गीट्टी उखळत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन चौकशी करण्याची मागणी होत आहे.
-------------------------------------------------
टीटवन-किनखेड रस्त्याची दुरवस्था
बार्शीटाकळी : तालुक्यातील टिटवन-किनखेड रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
----------------------------------------------------------
लोहारा परिसरात रेतीची अवैध वाहतूक सुरूच!
लोहारा : बाळापूर तालुक्यातील लोहारा परिसरात मन नदीपात्रातून रेतीची अवैध वाहतूक सुरूच असून, याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. रेतीमाफिया भरदिवसा नदीपात्रात अवैध उत्खनन करीत असल्याचे चित्र आहे. याकडे लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.
--------------------------------
पथदिवे बंदच; ग्रामस्थ त्रस्त!
निहीदा : परिसरातील अनेक गावात पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पथदिवे बंद असल्याने गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.