खबरदारी निवडणुकीची..
By admin | Published: October 8, 2014 12:52 AM2014-10-08T00:52:19+5:302014-10-08T00:52:19+5:30
अकोला पोलिसांनी केले २२१ पैकी ११९ शस्त्र जमा.
अकोला: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस विभागाकडून शहरातील परवाना असलेल्या शस्त्रधारकांना पोलिस ठाण्यांमध्ये शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील २२१ परवाना शस्त्रधारकांपैकी केवळ ११९ जणांनी शस्त्र संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये जमा केले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेद्वारे विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या पृष्ठभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली. निवडणूक काळात जिल्हय़ातील कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये, मतदारांना विशिष्ट उमेदवारालाच मतदान करण्यासाठी शस्त्राचा धाक दाखवू शकतात. तसेच निवडणूक काळामध्ये परवानाधारक व्यक्तीकडून शस्त्राचा दुरुपयोग होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या आदेशावरून शस्त्र छाननी समितीने संपूर्ण शस्त्र परवानाधारकाचा पूर्व इतिहास तपासून घेतल्यानंतर, ज्या परवानाधारकाचा राजकीय व्यक्तींशी किंवा उमेदवाराशी जवळचा संबंध आहे. तसेच त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शस्त्राचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे, अशा शस्त्र परवानाधारक व्यक्तीचे शस्त्र जमा करण्याचे निर्देश शस्त्र छाननी समितीने दिले होते. जिल्हाधिकार्यांनी दंडप्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ अन्वये शस्त्र परवानाधारकांना शस्त्र बाळगण्याबाबत बंदी घातली आहे. या आदेशातून राष्ट्रीयीकृत बँका, प तसंस्था, सुरक्षा कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे.
* जिल्हय़ात ४३३ परवाना शस्त्रधारक
जिल्ह्यात एकूण ४३३ शस्त्रे परवाने आहेत. एकूण ३८५ शस्त्रे आणि परवाने तपासण्यात आले. उर्वरि त शस्त्रांची तपासणी करण्यात येत आहे. त्यापैकी इतर शस्त्र लवकरच संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये जमा करण्यात येणार आहेत.