राज्यातील ४९८ रुग्णालयांमध्ये नव्याने बसविणार सीसी कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 01:17 PM2019-05-07T13:17:52+5:302019-05-07T13:19:57+5:30
अकोला: सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाºया राज्यातील ४९८ रुग्णालयांमध्ये नव्याने सीसी कॅमेरा आणि सीसी टीव्ही सिस्टीम बसविण्यात येणार आहे.
अकोला: सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाºया राज्यातील ४९८ रुग्णालयांमध्ये नव्याने सीसी कॅमेरा आणि सीसी टीव्ही सिस्टीम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सीसी कॅमेऱ्यांची नजर आणखी भेदक ठरणार असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा होणार आहे.
राज्यभरातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयांमध्ये नव्याने सीसी कॅमेरा आणि सीसी टीव्हीसिस्टीम लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एकूण ४ कोटी २ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आहे. सार्वजनिक रुग्णालयांचे मुख्य प्रवेशद्वार, बाह्यरुग्ण विभाग, पुरुष आंतररुग्ण विभाग, महिला आंतररुग्ण विभाग, वैद्यकीय अधिकारी कक्ष, शस्त्रक्रिया गृह आवार, लेबर रूम, बाल रुग्ण कक्षामध्ये सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
वºहाडात २० सीस्टीम व ५८ कॅमेरे
वºहाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात एकूण ५८ सीसी कॅमेरे आणि २० सीसी टीव्ही सीस्टीम लावण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वच ग्रामीण रुग्णालयात केवळ सीसी टीव्ही सीस्टीम लावण्यात येईल.
जिल्हानिहाय रुग्णालये
अकोला
जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, चतारी, तेल्हारा ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एक सीसी टीव्ही सिस्टीम लावण्यात येईल. शिवाय, जिल्हा स्त्री रुग्णालयात ८, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथे १४ सीसी कॅमेरे आणि एक सीसी टीव्ही सिस्टीम लावण्यात येईल.
बुलडाणा
जिल्ह्यातील ढाड, देऊळगाव माही, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, लोणार, मेहकर, मोताळा, सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एक सीसी टीव्ही सिस्टीम बसविण्यात येईल. शिवाय, शेगाव येथील रुग्णालयात १४ सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
वाशिम
जिल्ह्यातील कमरगाव, अनसिंग आणि मालेगाव या ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एक सीसी टीव्ही सिस्टीम, तर कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात १४ सीसी कॅमेरा आणि एक सीसी टीव्ही सिस्टीम लावण्यात येईल. जिल्हा रुग्णालयात १६ सीसी कॅमेºयांना मान्यता देण्यात आली आहे.
सर्वाजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाºया ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तसेच स्त्री रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात सीसी कॅमेरा आणि सीसी टीव्ही सिस्टीम बसविण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेमध्ये वाढ होणार असून, प्रत्येक घटनांवर लक्ष ठेवता येणार आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला