लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सर्वोपचार रुग्णालयात रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याने दर्शनी भागातील परिसर स्वच्छ झाला; मात्र रुग्णालयाच्या अंतर्गत भागात अस्वच्छता कायम आहे. शिवाय, कचरा जाळल्याने निर्माण होणाऱ्या धुरामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता सर्वोपचार रुग्णालयात बाह्य स्वच्छतेसोबतच अंतर्गत स्वच्छतेचेही मोठे आव्हान आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण व त्यांच्यासोबत येणाºया नातेवाइकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्येचा वाढता भार पाहता, त्या तुलनेत येथील मनुष्यबळ अपुरे ठरत आहे. गत रविवारी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे रुग्णालय परिसर स्वच्छ झाला, तरी अंतर्गत भागात मात्र अस्वच्छता कायम आहे. वाडाच्या बाजूलाच अस्वच्छता असल्याने येथे डासांसोबतच माशांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचा थेट परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे. येवढेच नाही, जुन्या टीबी वार्डासह बालरोग विभागाच्या बाजूला रुग्णालयातील कचरा जाळण्यात येत असल्याने रुग्णांसह नातेवाइकांच्या आरोग्यावरही त्याचा घातक परिणाम दिसून येत आहे. सर्वोपचार रुग्णालयात महिन्यातून एकदा स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असले, तरी येथे येणाºया रुग्ण व नातेवाइकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती आणि तशी व्यवस्था करण्याची गरज आहे.
कचरा पेट्यांची गरजसर्वोपचार रुग्णालयात स्वच्छतेसाठी मनुष्यबळ कमी असले, तरी योग्य नियोजन केल्यास अंतर्गत स्वच्छतेची समस्या सोडविणे शक्य आहे. वार्डात जाणाºया प्रत्येक मार्गावर कचरा पेट्यांची व्यवस्था केल्यास परिस्थिती बदलू शकते; मात्र यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज आहे. या उपक्रमात प्रशासनाला सुरक्षा रक्षकांचीही मदत घेणे शक्य आहे.
रुग्णालयातील गर्दीवर हवे नियंत्रणसर्वोपचार रुग्णालयात येणाºया रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची संख्या वाढली आहे. त्याचा थेट परिणाम रुग्णालयातील स्वच्छतेवर दिसून येत आहे. स्वच्छतेचे योग्य नियोजन होत नसल्याने रुग्णालयात दुर्गंधी पसरली आहे.वॉर्ड स्वच्छ, पण परिसरात अस्वच्छता सर्वोपचार रुग्णालयातील वार्डात स्वच्छता असली, तरी वार्डात जाणाºया मार्गावरच अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे वार्डात दुर्गंधी पसरली आहे.