आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत बाल शिवाजी शाळा प्रथम; कोठारी कॉन्व्हेंट द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:56 AM2017-10-14T01:56:04+5:302017-10-14T01:56:39+5:30
बाल शिवाजी शाळेत संस्थापक कै. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरशालेय वादविवाद स्पर्धा पार पडली. आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचा विषय ‘सोशल मीडिया विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी आवश्यक आहे.’ हा होता. स्पर्धेमध्ये आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत बाल शिवाजी शाळेने प्रथम स्थान पटकावले. कोठारी कॉन्व्हेंटने द्वितीय, तर स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार पटकावला.
अकोला: बाल शिवाजी शाळेत संस्थापक कै. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरशालेय वादविवाद स्पर्धा पार पडली. आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचा विषय ‘सोशल मीडिया विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी आवश्यक आहे.’ हा होता. स्पर्धेमध्ये आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत बाल शिवाजी शाळेने प्रथम स्थान पटकावले. कोठारी कॉन्व्हेंटने द्वितीय, तर स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार पटकावला.
सर्वप्रथम शाळेचे संस्थापक कै. अण्णासाहेब देव यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थाध्यक्ष अविनाश देव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वादविवाद स्पर्धेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या सानिका सुनील देशमुख, मानसी अरुण राऊत यांच्या चमूने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कोठारी कॉन्व्हेंटच्या इशिता पराग चिंचोळकर व गोविंद प्रदीप वनारसे यांनी पटकावला. स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या नेत्रा कुळकर्णी व मानसी कुळकर्णी यांच्या चमूला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट वक्ता म्हणून पूर्वा चंद्रशेखर चतारे व सानिका सुनील देशमुख यांना गौरविण्यात आले.
या स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रा. गजानन मालोकार, प्रा. दीपक दामोदरे होते. यावेळी प्रा. मोहन गद्रे उपस्थित होते. वादविवाद स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांसह खुशी नितीन मोहोड, पूर्वजा सुनील ठाकरे, आस्था अभय अग्रवाल, मानसी अरुण राऊत, सानिका सुनील देशमुख, यशराज प्रमोद तायडे यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी कार्यकारिणी सदस्य अनघा देव, मुख्याध्यापिक शोभा अग्रवाल, भारती कुळकर्णी उपस्थित होत्या. संचालन शिक्षिका रश्मी जोशी यांनी केले.