अकाेला : शहरासह जिल्ह्यात घडलेल्या खून, दराेडा, चाेरी व लुटमारीच्या घटनांसह महिलांची साेनसाखळी पळिवणाऱ्यांमध्ये बाल गुन्हेगारांचा विधी संघर्ष ग्रस्त बालक असल्याचे समाेर आले आहे. काही प्रकरणांत तर बाल गुन्हेगारांचा गुन्ह्यासाठी बड्यांनीही वापर केल्याची माहिती पाेलीस सूत्रांनी दिली. बाल गुन्हेगारांना कायद्याचे थाेडे संरक्षण असल्याने पाेलिसांनाही कारवाईसाठी माेठ्या अडचणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पश्चिम बंगाल येथील मालदा जिल्ह्यातील बनावट नाेटा प्रकरणात अकाेला जिल्ह्यात सर्वाधिक बाल गुन्हेगारांचा सहभाग् करून घेण्यात आला हाेता, अशी माहिती आहे. त्यावेळी पाेलिसांनी केलेल्या तपासात बनावट नाेटा चलणात आणण्यासाठी बाल गुन्हेगारांचा समावेश असल्याचे समाेर आले हाेते. त्यानंतर आता बाल गुन्हेगारा हत्याकांड, साेनसाखळी चाेरी, लुटमार, दराेडा यासारख्या गुन्ह्यातही असल्याची माहिती आहे. त्यामुळे पाेलिसांसमाेर माेठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांनाही कारवाई करताना प्रचंड अडचणी येत आहेत. चाेरी व मारामारीमध्ये जास्त बालगुन्हेगार असल्याचे आकडेवारीवरून समाेर आले आहे. बाल गुन्हेगारांचा समुपदेशन करीत त्यांना या गुन्हेगारी जगताततून बाहेर काढण्याचा प्रयत्नही शासन व पाेलीस प्रशासन करीत आहे.
कायद्यातील तरतुदी
बाल गुन्हेगाराचा गुन्ह्यात सहभाग असल्यास त्याला कारागृहाऐवजी बाल सुधारगृहात ठेवण्यात येते. यासाेबतच बाल गुन्हेगारास बाल गुन्हेगार न म्हणता त्यास विधी संघर्ष ग्रस्त बालक असे म्हणावे असे निर्देश आहेत. यासाेबतच त्याची वागणूक सुधारल्यानंतर अशा काेणत्याही खटल्यात त्याला शिक्षा हाेत नसल्याची माहिती आहे.
१८ वर्षांखालील मुलांवर दाखल गुन्हे
खून ०३
शस्त्रसंबंधी ०५
मारामारी १३
अत्याचार १२
चाेरी २४
इतर गुन्हे १८
२०१९ १८३
२०२० नाेव्हेंबर ७४
माेठ्यांचा चिडचिडेपणाचा बालमनावर परिणाम
घरातील माेठ्यांची चिडचिड बालमनावर परिणाम करणारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाेलीस अधिकाऱ्यांकडे असलेल्या तपासात बाल गुन्हेगारी संदर्भात माहिती घेतली असता घरातील वातावरणही बाल गुन्हेगार बनविण्यास काही प्रमाणात दाेषी असल्याची माहिती आहे. त्यामुळे बालकांचा समजून घेत त्यांना याेग्य ती वागणूक देण्याचा प्रयत्न करावा.