अकोला: आगामी विधानसभा निवडणुकीसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी करण्याच्या मुद्यावर वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हास्तरीय बैठकीत सोमवारी मंथन करण्यात आले. २५ जुलैपासून जिल्ह्यात तालुका व जिल्हा परिषद सर्कलनिहाय दौऱ्यांचे नियोजनही या बैठकीत करण्यात आले.शहरातील अशोक वाटिका सभागृहात वंचित बहुजन आघाडी व भारिप-बमसंची जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. आगामी विधानसभा निवडणूक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात तयारी करण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील तालुका अध्यक्षांनी पक्षाच्या संघटनात्मक कामांचे अहवाल सादर केले. आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी यावेळी केले. विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी जिल्ह्यात पक्षाच्यावतीने २५ जुलैपासून तालुका व जिल्हा परिषद सर्कलनिहाय दौºयांचे नियोजनही या बैठकीत करण्यात आले. या बैठकीला माजी आमदार हरिदास भदे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सल्लागार हिरासिंग राठोड, ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, सैफुल्लाखान, शोभा शेळके, संध्या वाघोडे, जमीरउल्लाखा पठाण, अशोक शिरसाट, बालमुकुंद भिरड, शंकरराव इंगळे, गजानन गवई, गौतम शिरसाट, सुभाष रौंदळे, प्रतिभा अवचार, डॉ. अशोक गाडगे, गजानन दांडगे, सुरेश शिरसाट, मंगला शिरसाट, प्रा. सुरेश पाटकर, मंगला इंगळे, विद्या अंभोरे, सुषमा कावरे, कोकिळा वाहुरवाघ, अनघा ठाकरे, प्रा. मंतोष मोहोळ, योगीता वानखडे, अंजली देशमुख, सम्राट सुरवाडे, विकास सदांशिव, सम्राट तायडे, गोपाल कोल्हे, हरिभाऊ वाघोडे यांच्यासह भारिप-बमसंचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.एकजुटीने काम करा!आगामी निवडणुकांच्या तयारीत पक्षाचे काम करताना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पायात पाय घालून काम करण्यापेक्षा हातात-हात घालून एकजुटीने काम करण्याचे आवाहन माजी आमदार हरिदास भदे यांच्यासह उपस्थित पदाधिकाºयांनी या बैठकीत केले. तसेच सर्कलनिहाय पक्षाचे निरीक्षक नेमण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.