हद्दवाढ क्षेत्रात नाल्याच्या पुरात अडकले नागरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:13 AM2021-06-10T04:13:58+5:302021-06-10T04:13:58+5:30
शहरात १८ मे राेजी अचानक धडकलेल्या वादळामुळे माेठी वित्तहानी झाली हाेती. त्यावेळी मनपाच्या नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाच्या मर्यादा उघड ...
शहरात १८ मे राेजी अचानक धडकलेल्या वादळामुळे माेठी वित्तहानी झाली हाेती. त्यावेळी मनपाच्या नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाच्या मर्यादा उघड पडल्या हाेत्या. त्यांनतर महापाैर अर्चना मसने, माजी महापाैर विजय अग्रवाल यांनी आयुक्त निमा अराेरा यांच्यासाेबत बैठक घेत आपत्ती निवारण कक्ष सुसज्ज ठेवण्याचे निर्देश दिले हाेते. परंतु, मंगळवारी रात्री मुसळधार पावसामुळे प्रभाग ३ मधील नाल्याच्या पुरात नागरिक अडकल्यानंतरही नैसर्गिक आपत्ती निवारण कक्ष गाढ झाेपेत असल्याचे समाेर आले आहे. विजय अग्रवाल यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अखेर पहाटे पाच वाजता अग्निशमन विभागाचे कर्मचारी याठिकाणी दाखल झाले.
थकीत देयकामुळे टेलिफाेन बंद
भाजपचे महानगराध्यक्ष अग्रवाल यांनी मध्यरात्री अग्निशमन विभागात मदतीसाठी संपर्क साधला असता तेथील टेलिफाेन बंद हाेता. थकीत देयकामुळे हा टेलिफाेन बंद असल्याचे समाेर आल्यामुळे प्रशासनाला कवडीचेही साेयरसूतक नसल्याचे दिसून आले.