शहरात ३० जण काेराेना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:23 AM2021-06-09T04:23:09+5:302021-06-09T04:23:09+5:30
७८३ जणांनी केली काेराेना चाचणी अकाेला: शहराच्या विविध भागात काेराेनाचा प्रादूर्भाव झाला आहे़ काही दिवसांपासून काेराेना बाधित रुग्णांची ...
७८३ जणांनी केली काेराेना चाचणी
अकाेला: शहराच्या विविध भागात काेराेनाचा प्रादूर्भाव झाला आहे़ काही दिवसांपासून काेराेना बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या सुमारे ७८३ जणांनी साेमवारी चाचणी केली़ यामध्ये २२८ जणांनी आरटीपीसीआर व ५५५ जणांनी रॅपिड अॅन्टीजेन चाचणी केली़ संबंधितांचे अहवाल चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
प्रभाग ८ मध्ये रस्त्यांची दुरवस्था
अकाेला:जुने शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील श्रध्दा काॅलनीसह अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना चालण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे मनपा प्रशासन व नगरसेवकांप्रती रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या समस्यांची दखल घेत मनपा प्रशासनाने सुवर्ण जयंती नगराेत्थान याेजनेतून रस्त्याचे नियाेजन करण्याची मागणी समाेर आली आहे.
जुना भाजी बाजारात घाणीचे साम्राज्य
अकाेला:शहरातील जैन मंदिर परिसरातील जुना भाजी बाजारात भाजीपाला व इतर साहित्याची विक्री केली जाते़ भाजीपाला व फळ विक्री केल्यानंतर सदर व्यावसायिक सडका भाजीपाला रस्त्यालगत उघड्यावर फेकून देत असल्याने अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे़ याप्रकाराकडे मनपाच्या आराेग्य निरीक्षकाचे दुर्लक्ष हाेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे़
बाजारात गर्दी; नियम पायदळी
अकाेला:संसर्गजन्य काेराेना विषाणूचा आलेख कमी हाेत चालल्याचे चित्र आहे. दरम्यान, ही बाब लक्षात घेता शासनाने निर्बंध शिथील करीत व्यवसाय सुरु करण्यासाठी सायंकाळी ४ वाजता पर्यंत परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी बाजारात साेशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवित गर्दी हाेत असल्याचे चित्र समाेर आले आहे.
उड्डाणपूलाखाली सांडपाण्याची समस्या
अकाेला: शहरात खदान पाेलिस ठाणे ते रेल्वे स्टेशन राेडपर्र्यंतच्या निर्माणाधिन उड्डाणपूलाखाली रस्ता रूंदीकरणाच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. पावसाचे पाणी व रस्त्यालगतच्या दाेन्ही बाजूच्या दुकानांमधील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे बांधकाम केले जात आहे. परंतु नाल्यांचे बांधकाम नियमानुसार हाेत नसल्याने याठिकाणी सांडपाण्याची समस्या निर्माण झाली असून यावर स्थानिक व्यावसायिकांनी आक्षेप घेतला आहे.