वाणिज्य वार्ता - केमिकल इंजिनिरिंगमध्ये करिअरच्या संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:17 AM2021-01-17T04:17:16+5:302021-01-17T04:17:16+5:30
ज्यामध्ये रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. निरनिराळ्या रसायनिक उत्पादनांची मागणी वाढत असल्याकारणाने या शाखेत पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये ...
ज्यामध्ये रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. निरनिराळ्या रसायनिक उत्पादनांची मागणी वाढत असल्याकारणाने या शाखेत पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात .आपल्या देशात रासायनिक उद्योग जवळपास १५५ अरब डॉलरचा आहे. जो २०२५ मध्ये ३२६ अरब डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. संपूर्ण जागतिक रासायनिक बाजारपेठेत भारताचा वाटा ३.५ टक्के आहे जो या वर्षाच्या अखेरीस ५ टक्क्यापर्यंत पोहोचण्याची आशा आहे. या शाखेत प्रवेश मिळवण्याकरता जेईई, एमएचटी,
सीईटी स्पर्धा परीक्षा देणे अनिवार्य आहे .अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर केमिकल प्रोसेसिंग,मॅन्युफॅक्टरिंग, प्रिंटिंग, प्लास्टी पॉलिमर, ऑइल व पेंट, पेट्रोलियम व पेट्रोकेमिकल ,रेफाईनिंग टेक्नॉलॉजी, पल्प व पेपर टेक्नोलॉजी, औषधनिर्माण, ऑइल व नॅचरल गॅस यासह विविध क्षेत्रामध्ये रोजगार मिळविण्यासाठी या अभियांत्रिकीचा फायदा होतो.
दिल्ली, मुंबई, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, चेन्नई, रुरकीमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्था तसेच कानपूरची एचबीटीआई, आईआईटी वाराणसी, आईसीटी मुंबई, एलआईटी नागपूर तसेच बाभूळगाव (जहाँ), अकोला येथी श्री शिवाजी शिक्षणसंस्था अमरावती संचलित अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय येथे हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. सध्या देशात बहुत अशा मल्टिनॅशनल कंपन्या प्रवेश करीत आहेत. ज्यामध्ये
विद्यार्ध्यांना भरपूर रोजगाराची संधी वर्तवली जात आहे.या क्षेत्रात पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना हिंदुस्थान पेट्रोलियम कोर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, इंडियन पेट्रोलियम ,ऑइल अँड नॅचरल गॅस कोर्पोरेशन ,राष्ट्रीय केमिकल्स
अँड फर्टिलायझर्स, नॅशनल थर्मल पावर कोर्पोरेशन ,बार्क, तसेच इसरो सारख्या सरकारी कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. तसेच देशातील अग्रगण्य खासगी कंपन्यांमध्येदेखील रोजगार उपलब्ध आहे. ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीस ,बीएएसएफ, डाऊ केमिकल, ड्यूपॉइंट इंडिया, बायर केमिकल, अशियन पेंट्स, टाटा कन्सल्टन्सी, एल अँड टी, घरडा केमिकल्सचा समावेश आहे.
८ बाय ५