अकाेलेकरांना दिलासा; ऑगस्टपर्यंत शास्तीची आकारणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:13 AM2021-06-10T04:13:54+5:302021-06-10T04:13:54+5:30

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नागरी दलितेतर वस्ती सुधार याेजना, सुवर्णजयंती नगराेत्थान याेजनेंतर्गत मंजूर दहा काेटी ५० लाख रुपयांच्या प्रस्तावावर चर्चा ...

Consolation to Akalekar; No penalty until August! | अकाेलेकरांना दिलासा; ऑगस्टपर्यंत शास्तीची आकारणी नाही!

अकाेलेकरांना दिलासा; ऑगस्टपर्यंत शास्तीची आकारणी नाही!

Next

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नागरी दलितेतर वस्ती सुधार याेजना, सुवर्णजयंती नगराेत्थान याेजनेंतर्गत मंजूर दहा काेटी ५० लाख रुपयांच्या प्रस्तावावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. मालमत्ताधारकांना थकीत करातून शास्तीच्या दंडात्मक रकमेतून सूट मिळावी, यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत शास्ती अभय याेजना सुरू ठेवण्याचा प्रस्ताव पदाधिकाऱ्यांकडून सभागृहात सादर करण्यात आला हाेता. वर्षाकाठी शास्तीची रक्कम तब्बल २४ टक्के हाेत असून, ही पठाणी वसुली बंद करण्याची गरज असल्याचे मत गटनेता राजेश मिश्रा यांनी व्यक्त केले. भविष्यात मनपाने केवळ अर्धा टक्का शास्ती लागू करावी, असे मत त्यांनी मांडले. मिश्रा यांच्या मताचे गजानन चव्हाण, काँग्रेसचे नगरसेवक इरफान खान, राष्ट्रवादीचे नगरसेवक अब्दुल रहीम पेंटर यांनी समर्थन केले.

नळ कनेक्शनसाठी अभय याेजनेला मुदतवाढ

शास्तीची रक्कम माफ केल्यास नागरिक कराचा भरणा करतील. याप्रमाणे पुन्हा ४०० रुपयांत नळ कनेक्शन देण्यासाठी अभय याेजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी माजी महापाैर विजय अग्रवाल यांनी केली. त्यावर या दाेन्ही विषयांना महापाैर अर्चना मसने यांनी मंजुरी दिली.

शिवरच्या शेत सर्व्हे क्रमांकात केला बदल!

शिवरलगत विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी परिसरातील शेत सर्व्हेमध्ये बदल करण्यात आला हाेता. या जागेचा शेत सर्व्हे क्रमांक बदलण्याचा ठराव खुद्द सत्ताधारी भाजपने ९ ऑक्टाेबर २०१९ राेजीच्या सभेत मंजूर केला हाेता. झालेली चूक निस्तरण्यासाठी आता पुन्हा या जागेच्या शेत सर्व्हे क्रमांकात फेरबदल करण्याचा प्रस्ताव भाजप नगरसेवक अनिल मुरुमकार यांनी मांडला असता त्याला सभेने मंजुरी दिली. हा शिवरवासीयांसाठी माेठा दिलासा मानला जात आहे.

Web Title: Consolation to Akalekar; No penalty until August!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.