लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे घराचे बांधकाम रखडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:17 AM2021-02-14T04:17:37+5:302021-02-14T04:17:37+5:30
चतारी येथील अनंता नामदेव ढोरे यांनी काही महिन्यांपूर्वी घराच्या बांधकामाला सुरुवात केली. परंतु जमिनीपासून अवघ्या सहा फूट अंतरावर असलेल्या ...
चतारी येथील अनंता नामदेव ढोरे यांनी काही महिन्यांपूर्वी घराच्या बांधकामाला सुरुवात केली. परंतु जमिनीपासून अवघ्या सहा फूट अंतरावर असलेल्या विद्युत तारा गेल्याने घराचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे अनंता ढोरे यांचा संसार उघड्यावर आला आहे. तसेच सदर लोंबकळलेले विद्युत तारा मृत्यूला आमंत्रण देत आहेत. चतारी येथे आठ ते दहा घरांच्या छतावरून लोंबकळलेल्या विद्युत तारा गेल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी संबंधित सस्ती वीज केंद्राकडे वारंवार तक्रार केली. परंतु सस्ती वीज केंद्राकडून तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन लोंबकळणाऱ्या विद्युत तार काढण्याची मागणी होत आहे.
फोटो:
लोंबकळणाऱ्या तारांमुळे मृत्यूला आमंत्रण
चतारी येथे आठ ते दहा घरांवरून लोंबकळणाऱ्या तार गेल्याने अनेक वेळा शॉर्टसर्किट होऊन किरकोळ घटना घडल्या आहे. मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लोंबकळणाऱ्या विद्युत तार मृत्यूला आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे.
माझ्या घराच्यावरून लोंबकळणाऱ्या विद्युत तार गेल्याने घराचे बांधकाम रखडले आहे. याबाबत सस्ती वीज उपकेंद्राकडे वारंवार तक्रार केली. परंतु तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे माझा कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. वरिष्ठांनी दखल घ्यावी.
-अनंता नामदेव ढोरे ग्रामस्थ चतारी