दूषित पाणीपुरवठा; अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:19 AM2021-07-30T04:19:25+5:302021-07-30T04:19:25+5:30

लहान मुलांकडे द्या विशेष लक्ष लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात लहान मुलांमध्ये रोटा व्हायरस सोबतच डायरिया, ...

Contaminated water supply; Akolekar's health in danger! | दूषित पाणीपुरवठा; अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात !

दूषित पाणीपुरवठा; अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात !

Next

लहान मुलांकडे द्या विशेष लक्ष

लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात लहान मुलांमध्ये रोटा व्हायरस सोबतच डायरिया, पोट दुखणे, पाचनशक्तीशी निगडित विविध आजार संभावतात. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना दूषित पाणी पाजल्यास त्यांना पोटाशी निगडीत विविध आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे लहान मुलांना पिण्यासाठी पाणी देताना ते उकडूनच घ्यावे.

असे करा स्वत:चे संरक्षण

पिण्यासाठी पाण्याचा उपयोग करण्यापूर्वी ते उकडून घ्यावे.

पाण्याचे निर्जंतुकीकरणासाठी योग्य मात्रेत क्लोरिनचा वापर करावा.

पिण्याच्या पाण्याची भांडी नियमित स्वच्छ धुवावीत.

पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाण्याच्या सेवनामुळे पोटाशी निगडीत आजारांचा धाेका असतो. त्यामुळे नागरिकांनी पिण्यासाठी पाण्याचा वापर करण्यापूर्वी पाणी उकडून घ्यावे. तसेच क्लोरिनच्या योग्य मात्रेचा उपयोग करुन पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे.

- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, वैद्यकीय अधिकारी, जीएमसी, अकोला

Web Title: Contaminated water supply; Akolekar's health in danger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.