कार्यक्रम उद्घाटनप्रसंगी डॉ. एस. यथीराज, नामवंत श्वान तज्ज्ञ तथा माजी अधिष्ठाता, बेंगळुरू, प्रा.डॉ. ए. पी. सोमकुंवर, अधिष्ठाता तथा संचालक शिक्षण आणि प्रा.डॉ. विलास आहेर, संचालक विस्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रशिक्षण समारोपप्रसंगी नामवंत पशुतज्ज्ञ प्रा डॉ. जे. पी. व्हार्शिणी (सुरत) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने होते.
प्रशिक्षण समन्वयक तथा चिकित्सालयीन अधीक्षक प्रा डॉ. सुनील वाघमारे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा सविस्तर अहवाल सादर केला. प्रशिक्षणात देशभरातून एकूण ४१८ प्राध्यापक, विद्यार्थी, पशुवैद्यकीय अधिकारी, संशोधक आदी सहभागी झाले. संचालन सहसमन्वयक डॉ. किशोर पजई तर आभार प्रदर्शन डॉ. पंकज हासे यांनी केले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी सह समन्वयक म्हणून डॉ महेशकुमार इंगवले, डॉ. प्रवीण बनकर, आलेम्बिक फार्माचे उपाध्यक्ष श्री. पी. करुणानिथी, डॉ. संतोष शिंदे व चमूने परिश्रम घेतले.