अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवार, १९ मे रोजी आणखी १५ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ९५८ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३०१, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये १९२ असे एकूण ४९३ रुग्ण आढळून आल्याने, एकूण रुग्णसंख्या ५१,६४९ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,८१४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,५१३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी १५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये रोहना येथील ६५ वर्षीय महिला, बाळापूर येथील ७० वर्षीय पुरुष, गायत्री नगर येथील ५० वर्षीय महिला, पंचशिल नगर येथील ६५ वर्षीय पुरुष, अकोट येथील ३३ वर्षीय महिला, कान्हेरी सरप येथील ४५ वर्षीय पुरुष, पातूर येथील ७७वर्षीय पुरुष, जूने शहर येथील ४५ वर्षीय पुरुष, दहिहांडा येथील ५० वर्षीय पुरुष, कुंभारी येथील ६५ वर्षीय पुरुष, मोठी उमरी येथील ३७ वर्षीय महिला, फडके नगर येथील ५५ वर्षीय महिला, रोहना येथील ४३ वर्षीय पुरुष, बालाजी नगर येथील ४४ वर्षीय पुरुष व बंजारा नगर येथील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मुर्तिजापुर- १०, अकोट- ५०, बाळापूर-३५, तेल्हारा-२३, बार्शी टाकळी-३१, पातूर-३४, अकोला- ११८ (अकोला ग्रामीण- ४४, अकोला मनपा क्षेत्र- ७४)
५२७ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३०, मुलांचे वसतीगृह येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, पीडीकेव्ही येथील चार, आर्युवेदिक महाविद्यालय येथील १०, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, खासगी रुग्णालयांमधील ३९ आणि होम आयसोलेशन मधील ४३५ असे एकूण ५२७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६,५४६ ॲक्टिव्ह रुगण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५१,६४९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४४,१४५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ९५८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,५४६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.