अकोला : जिल्ह्यात बुधवार, १४ जुलै रोजी कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला, तर आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये पाच व रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये सहा असे एकूण ११ नवे रुग्ण आढळून आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी ८५४ आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये पाच जण पॉझिटिव्ह आहेत, तर उर्वरित ८४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला. मंगळवारी दिवसभरात झालेल्या ६७० रॅपिड चाचण्यांमध्ये सहा जण पॉझिटिव्ह आढळून आले. बुधवारी अकोला शहरातील बोरकावली भागातील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दोघांची कोरोनावर मात
ओझोन रुग्णालयाती एक व अवघाते रुग्णालयातील एक अशा दोन जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.
५३ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत ५७,७०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी ५६,५२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. १,१३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ५३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.