अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असून, रविवार, ११ जुलै रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये केवळ दोन, तर रॅपिड ॲंटिजन चाचण्यांमध्ये पाच असे सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५७,६८८वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३३० अहवाल प्राप्त झाले. यामध्ये केवळ बाळापूर व मुर्तीजापूर शहरातील प्रत्येकी एक असे दोघे पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३२८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहेत. शुक्रवारी करण्यात आलेल्या ५०१ रॅपिड चाचण्यांमध्ये पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले.
सात जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील पाच, गोयंका गर्ल्स हॉस्टेल येथील एक, आयकॉन हॉस्पिटल येथील एक अशा एकूण सात जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.
४४ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत ५७,६८८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १,१३० मृत झाले, तर ५६,५१४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत ४४ जणांवर उपचार सुरू आहेत.