अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर असून, बुधवार, १२ मे रोजी आणखी १० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा ८३७ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६७४, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये १९३ असे एकूण ८६७रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ४७,७९७ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,८२३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २,१४९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी दहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामध्ये
सौंदाळा ता.तेल्हारा येथील ४१ वर्षीय पुरुष, अशोक नगर येथील ४४ वर्षीय महिला, गोडबोले प्लॉट येथील ४२ वर्षीय महिला, विझोरा ता.बर्शीटाकळी येथील ५५वर्षीय पुरुष, मुर्तिजापूर येथील ३५ वर्षीय महिला, बाखराबाद येथील ५६ वर्षीय पुरुष, खडकी येथील ६७ वर्षीय महिला, खदान येथील ५५ वर्षीय पुरुष, वाडेगाव येथील २४ वर्षीय पुरुष आणि खदान येथील ८४ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
मुर्तिजापुर- ८३, अकोट-१४१, बाळापूर-५३, तेल्हारा-६०, बार्शी टाकळी-४८, पातूर-४४, अकोला-२४५. (अकोला ग्रामीण-४१, अकोला मनपा क्षेत्र-२०४)
५८४ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४२, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील चार, देवसार हॉस्पीटल येथील सहा, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, गोयका गर्ल्स हास्टेल येथील तीन, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील सहा, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील चार, खासगी रुग्णालयातील ६५, तर होम आयसोलेशन मधील ४६५ अशा एकूण ५८४जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६,८१२ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४७,७९७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४०,१४८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८३७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,८१२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.