अकोला : जिल्ह्यात मंगळवार, २२ जून रोजी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोना बळींची संख्या १,१२२ झाली आहे. गत चोवीस तासात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १३ व रॅपिड ॲंटिजन चाचण्यांमध्ये १६, असे एकूण २९ नवे रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ५७,४५२ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीलएल लॅबकडून मंगळवारी एकूण ७३६ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १३ पॉझिटिव्ह आढळून आले, तर उर्वरित ७२३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. कोरोनावर उपचार सुरु असलेल्या गोरक्षण रोड भागातील ६३ वर्षीय पुरुष व शिवणी येथील ३५ वर्षीय पुरुष अशा दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये तेल्हारा तालुक्यात एक, बाळापूर तालुक्यात सहा, अकोला ग्रामीणमध्ये एक व अकोला मनपा क्षेत्रात पाच असे १३ पॉझिटिव्ह आढळून आले. रविवारी पार पडलेल्या ७१२ रॅपिड चाचण्यांमध्ये १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
१६५ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार,खासगी कोविड रुग्णालयांमधील १८, तर होम आयसोलेशन मधील १४७ अशा एकूण १६५ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.
५८० ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,४५२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५५,७५० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१२२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.