अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख घसरणीला लागला असून, रविवार, ३० रोजी आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा १,०६५वर पोहोचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १७९, तर रॅपिड ॲंटिजन चाचण्यांमध्ये ६० असे एकूण २३९ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५५,५२१ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅब कडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,८६० अहवाल प्राप्त झाले. यापैकी १७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,६८१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी बाळापूर वेस ता. पातूर येथील ४५ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद झाली.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मुर्तिजापुर- १९, अकोट-२५, बाळापूर-१३, बार्शीटाकळी- १४, पातूर-१५, तेल्हारा-१२ अकोला-८१. (अकोला ग्रामीण-२३, अकोला मनपा क्षेत्र-५८)
४८९ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २७, पीकेव्ही जम्बो हॉस्पीटल येथील चार, जिहा स्त्री रुग्णालय येथील चार, आर्युदिक महाविदयालय येथील चार, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, खासगी कोविड रुग्णालयांमधील ३७, तर होम आयसोलेशन मधील ४१० अशा एकूण ४८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४,६१० ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५५,५२१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४९,८४६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,०६५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,६१० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.