गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कोरोना नियंत्रित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:23 AM2021-09-06T04:23:43+5:302021-09-06T04:23:43+5:30
अशी आहे आठ महिन्यांची स्थिती महिना- रुग्ण - मृत्यू जानेवारी - ११३५ - १४ फेब्रुवारी - ४५२७ - ३१ ...
अशी आहे आठ महिन्यांची स्थिती
महिना- रुग्ण - मृत्यू
जानेवारी - ११३५ - १४
फेब्रुवारी - ४५२७ - ३१
मार्च - ११५५५ - ८६
एप्रिल - १२४६० - २३६
मे - १५३६१ - ३७६
जून - १९१८ - ५८
जुलै - १६५ - ०७
ऑगस्ट - ५७ - ०२
चाचण्या वाढविण्याचे निर्देश
रुग्ण घटले ही बाब दिलासादायक असली तरी सध्या विविध तापांच्या साथीही सुरू आहेत. शिवाय रुग्ण कोविड चाचणीसाठी पुढे येताना दिसत नाहीत. संसर्गाची भीतीच कमी झाल्याने चाचण्या मोठ्या प्रमाणात घटल्या आहेत. मात्र राज्य शासनाने चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले असून आता केवळ तपासणीस येणारे संदिग्ध रुग्ण आणि बाधितांच्या संपर्कातील निकट आणि दूरस्थ संपर्कातील नागरिकांच्या कोविड चाचण्या करण्यात येत आहेत.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच वाढ
गेल्या वर्षातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता ऑगस्ट महिन्यात १४०० रुग्ण आढळले होते. तर ४७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर महिन्यात मात्र तब्बल ३४६८ रुग्ण आढळले होते. ८४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते विषाणूजन्य आजारांच्या फैलावासाठी सप्टेंबर महिन्यात पोषक वातावरण असते.