अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख पुन्हा वाढत असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवार, १९ डिसेंबर रोजी जिल्ह्यात आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची एकूण संख्या ३०९ झाली आहे. आणखी ३४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १०११६ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी ५८१ अहवाल प्राप्त झाले असून, यापैकी ३४ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ५४७ निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कौलखेड व तेल्हारा येथील प्रत्येकी तीन, रणपिसे नगर, केडीया प्लॉट, जवाहर नगर व राम नगर येथील प्रत्येकी दोन, तर मालेगाव, सिंधी कॅम्प, दिपक चौक, मूर्तिजापूर, तोष्णीवाल लेआऊट, मलकापूर, जठारपेठ, गोरक्षण रोड, चोहट्टा बाजार, खेडकर नगर, दहीहंडा ता. अकोट, राधाकिशन प्लॉट, मेहरबानू कॉलेज, एचडीओ ऑफिस, कृषी नगर, जुने राधाकिशन प्लॉट, आडगाव ता. तेल्हारा, वाशिम बायपास, केळकर हॉस्पिटल व अकोट येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
तीन पुरुषांचा मृत्यू
कोरोनावर उपचार सुरु असलेल्या तिघांचा शनिवारी मृत्यू झाला. मुर्तीजापूर तालुक्यातील पराड येथील ६५ वर्षीय पुरुष, मोठी उमरी येथील ८२ वर्षीय पुरुष आणि नायगाव येथील ५४ वर्षीय पुरुष अशा तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तीघांना अनुक्रमे १७ डिसेंबर, ९ डिसेंबर व ८ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
७७१ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०११६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९०३६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७७१ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.