जिल्ह्यात दररोज एक हजारावर चाचण्या
जिल्ह्यात दरारोज सुमारे एक हजारापेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत. यामध्ये आरटीपीसीआर आणि रॅपिड ॲन्टिजन चाचण्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत आरटीपीसीआरच्या सरासरी ७००, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ६५० चाचण्या करण्यात येत आहेत.
जून महिन्यात चाचण्यांचे प्रमाण घटले आहे. मागील चार महिन्यात दररोज सुमारे २,५०० चाचण्या करण्यात येत होत्या.
आरोग्य यंत्रणा सतर्क
जिल्ह्यात कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिअंट अद्याप आढळला नाही, मात्र आरोग्य यंत्रणा सतर्क आहे.
आयजीआयबी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या आरएनए सॅम्पलचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाही.
त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी नियमित मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आढावा
कोरोनाचे एकूण रुग्ण - ५७,५०९
बरे झालेले रुग्ण - ५५,९६२
उपचार घेत असलेले रुग्ण - ४२३
बळी - १,१२४