CoronaVirus in Akola : वाडेगावातील १८ पैकी ९ जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 04:59 PM2020-04-03T16:59:13+5:302020-04-03T17:01:36+5:30

उर्वरित ९ जणांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.

CoronaVirus in Akola: 09 out of 18 people medical reports negative! | CoronaVirus in Akola : वाडेगावातील १८ पैकी ९ जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह!

CoronaVirus in Akola : वाडेगावातील १८ पैकी ९ जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह!

Next
ठळक मुद्दे उर्वरित ९ जणांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे. इतरही रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू असून, त्यांचेही वैद्यकीय चाचणी अहवाल अद्याप आले नाहीत.

अकोला : वाडेगाव येथील १८ संदिग्ध रुग्णांपैकी ९ जणांचे वैद्यकीय अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आले. तर उर्वरित ९ जणांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.
वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळापूर पोलिसांच्या मदतीने मंगळवारी रात्री उशिरा येथील १८ जणांना कोरोनाचे संदिग्ध रुग्ण म्हणून सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. हे १८ जण दिल्ली येथे गेले होते; परंतु ते २ मार्च रोजीच अकोल्यात परतल्याचे तसेच कोणीही विदेशवारी केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मंगळवार ३१ मार्च रोजी कोरोनाचे संदिग्ध म्हणून स्थानिक आरोग्य विभागाने या १८ जणांना आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. त्यांचे वैद्यकीय चाचणी नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी सकाळी यातील ९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह असल्याचे समोर आहे. तर उर्वरित ९ जणांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. या सर्वांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. याशिवाय इतरही रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू असून, त्यांचेही वैद्यकीय चाचणी अहवाल अद्याप आले नाहीत.


समुपदेशनानंतर दोघांना केले दाखल!
दिल्ली येथे नोकरीनिमित्त गेलेल्या अकोल्यातील दोघांना शुक्रवारी प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना समुपदेशन कक्षात आणले होते. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना आयसोलेशन कक्षात दाखल होण्यास सांगितले; परंतु यावेळी दोन्ही संदिग्ध रुग्णांना दाखल होण्यास नकार दिला. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते; मात्र वैद्यकीय अधिकाºयांनी केलेल्या समुपदेशनानंतर त्या दोघांना आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले. हे दोन्ही संदिग्ध रुग्ण १५ दिवसांपूर्वीच अकोल्यात परत आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

Web Title: CoronaVirus in Akola: 09 out of 18 people medical reports negative!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.