अकोला : अकोल्यात कोरोनाचा संसर्ग होण्याचे सत्र सुरुच असून, मंगळवार, ९ जून रोजी यामध्ये आणखी ११ जणांची भर पडली. मंगळवारी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची एकूण संख्या ८३२ वर पोहचली आहे. तथापी, आतापर्यंत ५४५ जणांनी कोरोनावर मात केल्याने सद्या २४८ जणांवर उपचार सुरु असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा म्हणून अकोल्याची ओळख निर्माण झाली आहे. सोमवार, ८ जून पर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ८२१ होता. त्यामध्ये मंगळवारी आठ जणांची भर पडत हा आकडा ८३२ वर पोहचला आहे. मंगळवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून एकूण ११३ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११ पॉझिटिव्ह, तर उर्वरित १०२ निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त पॉझिटीव्ह अहवालात सहा महिला व पाच पुरुष आहेत. यामध्ये जुने शहर भागातील दोन, तर उर्वरित माळीपुरा, खदान, सोनटक्के प्लॉट, श्रीहरीनगर सालासर मागे, गाडगेनगर, रेल्वेगेट न्यु तापडीया नगर, अकोट फैल, जवाहरनगर , बाळापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद आहे.
प्राप्त अहवाल-११३पॉझिटीव्ह-११निगेटीव्ह-१०२
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-८३२मयत-३९(३८+१),डिस्चार्ज-५४५दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२४८