CoronaVirus in Akola : दिवसभरात १८६ कोरोनामुक्त; एकाचा बळी; २५ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 06:28 PM2020-10-04T18:28:30+5:302020-10-04T18:28:47+5:30
CoronaVirus in Akola १८६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे सत्र सुरुच आहे. रविवार, ४ आॅक्टाबर रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २४४ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७,६२० वर गेली आहे. दरम्यान, १८६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १८९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १६४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये हिंगणा फाटा येथील चार जणांसह डाबकी रोड येथील दोन, पारडी, बार्शीटाकळी, जवाहर नगर, मोठी उमरी, जीएमसी , गीरीनगर, मलकापूर व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी अकोट व सुधीर कॉलनी येथील प्रत्येकी तीन, मूर्तिजापूर, जीएमसी, आदर्श कॉलनी, दानापूर ता. अकोट व पाथर्डी ता. तेल्हारा येथील प्रत्येकी एक रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू
रविवारी आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. हा रुग्ण बस स्टँड, अकोला येथील ५० वर्षीय पुरुष असून, त्यांना १ आॅक्टोबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
१८६ जणांना डिस्चार्ज
रविवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ४४, कोविड केअर सेंटर अकोला येथून नऊ, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून पाचा, युनिक हॉस्पिटल येथून एक, अवधाते हॉस्पिटल मूर्तिजापूर येथून एक, अकोला अक्सिडेंट क्लीनिक येथून तीन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून एका, आयुर्वेदिक महाविद्यालय येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून नऊ, कोविड केअर सेंटर बार्शिटाकळी येथून तीन, कोविड केअर सेंटर हेन्डज मूर्तिजापूर येथून ११ तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले ९६ अशा एकूण १८६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
८६० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,६२० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६५१६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २४४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ८६० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.