CoronaVirus in Akola : दिवसभरात २१ रुग्ण वाढले; ८१ जण बरे झाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 06:23 PM2020-07-10T18:23:02+5:302020-07-10T18:25:22+5:30

कारागृहातील ६९ कैद्यांसह तब्बल ८१ जणांनी कोरोनावर मात केली.

CoronaVirus in Akola: 21 patients increased in a day; 81 people recovered! | CoronaVirus in Akola : दिवसभरात २१ रुग्ण वाढले; ८१ जण बरे झाले!

CoronaVirus in Akola : दिवसभरात २१ रुग्ण वाढले; ८१ जण बरे झाले!

Next
ठळक मुद्दे२१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.एकूण संख्या १८४९ वर गेली.सद्यस्थितीत ३०८ जणांवर उपचार सुरु.

अकोला : कोरोनाचा विदर्भातील हॉटस्पॉट अशी ओळख निर्माण झालेल्या अकोल्यात दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असतानाच बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. शुक्रवार, १० जुलै रोजी जिल्हाभरात आणखी २१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर दुसरीकडे कारागृहातील ६९ कैद्यांसह तब्बल ८१ जणांनी कोरोनावर मात केली. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८४९ वर गेली असून, सद्यस्थितीत ३०८ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी दिवसभरात २३० जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २०९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये सात महिला व १४ पुरुष आहेत. त्यातील चार जण कंवरनगर येथील, तिघे अकोट, तिघे बाळापूर, दोन बार्शीटाकळी, दोन कृषिनगर-अकोला, तर उर्वरीत तारफैल, कावसा ता. अकोट,पातूर, बाळापूर, बोरगाव, सिंधी कॅम्प व मोठी उमरी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्हा कारागृहातील ६९ जणांसह ८१ जणांना डिस्चार्ज
शुक्रवारी दिवसभरात ८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दुपारनंतर कोविड केअर सेंटर मधून पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात तिघे बाळापूरचे तर दोघे हरिहर पेठ येथील रहिवासी आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील दोन जण डाबकी रोड येथील रहिवासी असून उर्वरित वाशीम बायपास, हरिहर पेठ, सिव्हिल लाईन, पातूर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच जिल्हा कारागृहातील कोविड केअर सेंटर मधील ६९ जण बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. तथापि, कोरोनातून बरे झालेले कैदी केवळ कारागृहात स्थापन केलेल्या कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज झाले आहेत. त्यांची कारागृहातच स्वतंत्र व्यवस्था व देखभाल केली जात आहे, असे जिल्हा कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

३०८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण १८४९ (१८२८+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९१ जण (एक आत्महत्या व ९० कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १४५० आहे. तर सद्यस्थितीत ३०८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

 

 

Web Title: CoronaVirus in Akola: 21 patients increased in a day; 81 people recovered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.