CoronaVirus in Akola : दिवसभरात ९६ रुग्ण वाढले; ८५ बरे झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 06:43 PM2020-09-06T18:43:52+5:302020-09-06T18:44:02+5:30
यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४६११ वर गेला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार, ६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ९६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४६११ वर गेला आहे. दरम्यान, ८५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ५९६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९६ पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५०० जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. सकाळच्या अहवालांमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कान्हेरी येथील २२, तेल्हारा येथील सहा, बाळापूर येथील चार, सस्ती, आळंदा, गोरेगाव व हातरुन येथील प्रत्येकी दोन, पातूर, चान्नी, सिंदखेड, लहान उमरी, मुर्तिजापूर, राऊत वाडी, जूना कपडा बाजार व श्रावगी प्लॉट येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळच्या अहवालांमध्ये बेलुरा येथील १८, चोहट्टा बाजार येथील नऊ, कौलखेड, तेल्हारा, सिंधी कॅम्प व केशवनगर येथील प्रत्येकी दोन, अडगाव ब्रु., पातूर, बाळापूर नाका, गणेश कॉलनी, वाशिम बायपास, बळवंत कॉलनी, शिवसेना वसाहत, जठारपेठ, लहान उमरी, हरिहर पेठ, आळसी प्लॉट, रामनगर व गजानन नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
८५ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५६, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १६, मुर्तिजापूर उप जिल्हा रुग्णालयातून आठ, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून एक तर हॉटेल रणजित येथून तीन अशा एकूण ८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
९४१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४६११ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३५०५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ९४१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.