अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, बुधवार, १६ सप्टेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ८४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५८९५ झाली आहे. दरम्यान, आणखी १० जणांनी कोरोनावर मात केल्याने सद्यस्थितीत १२९३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १६७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८४ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८३ अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये ३८ महिला व ४३ पुरुष आहे. यामध्ये मुर्तिजापूर येथील १३, खामखेड येथील सात, चान्नी येथील पाच, जयहिंद चौक, तोष्णीवाल लेआऊट व जठारपेठ येथील प्रत्येकी चार, अकोट, खडकी, डाबकी रोड व अंबुजा फॅक्टरी कान्हेरी गवळी येथील प्रत्येकी तीन, लहान उमरी, कौलखेड, खेतान नगर, शिवापूर, बापू नगर व पातूर येथील प्रत्येकी दोन, अमृतवाडी, जीएमसी, स्वराज्य पेठ, नेहरु नगर, कोठारी वाटीका, नानक नगर, बंजारा नगर, जूने शहर, दहिहांडा, न्यु तारफैल, आपातापा, लसणापूर ता. मुतिजापूर,गीता नगर, शिर्ला, रेणूका नगर, शिव नगर, देशमुख फैल, मजलापूर ता. पातूर, तांदळी ता. पातूर, सिंधीकॅम्प, पारस, चौर ेप्लॉट, सहनगाव अकोला येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.१२९३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५८९५ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४४१३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १८९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १२९३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.
CoronaVirus in Akola : आणखी ८४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 1:43 PM