अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, रविवार, १० जानेवारी रोजी अकोला शहरातील आणखी एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींची संख्या ३२४ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ४३ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १०९१४ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ५२१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४७८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सिंधी कॅम्प येथील तीन, डाबकी रोड, मलकापूर, जठारपेठ व रणपिसे नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित जांभा ता. मुर्तिजापूर, रचना कॉलनी, मरोडा ता. अकोट, पीकेव्ही, राधे नगर, न्यु तापडीया नगर, कृषि नगर, भीम नगर, जूने शहर, अकोट, छोटी उमरी, खडकी, आर.के. प्लॉट, गीता नगर, गोरक्षण रोड, तांदळी बु. ता. पातूर, सहारा नगर, कैलास नगर, बिर्ला गेट, गौतम नगर, अशोक नगर, आदर्श कॉलनी, व्हिएचबी कॉलनी, दक्षता नगर, कौलखेड, पातूर, दिपक चौक, सिलोडा व रामदासपेठ येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी लाडेगाव ता. अकोट, देवरी ता. अकोट व जलतारे प्लॉट येथील प्रत्येकी एक अशा तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
४७ वर्षीय महिला दगावली
रविवारी चक्रधर कॉलनी, गुडधी रोड येथील ४७ वर्षीय महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यांना ६ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
१९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, स्कायलार्क हॉटेल येथून एक, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, अकोला ॲक्सीडेंट क्लिनीक येथून दोन अशा एकूण १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६१७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,९१४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,९७३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६१७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.