CoronaVirus in Akola : दोघांचा मृत्यू; १५२ पॉझिटिव्ह, १५९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 09:56 PM2020-09-11T21:56:04+5:302020-09-11T21:56:18+5:30
आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १४५ तर रॅपिड चाचण्यांमध्ये सात असे एकून १५२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५२८९ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १७५ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १४५ तर रॅपिड चाचण्यांमध्ये सात असे एकून १५२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५२८९ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४११ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २६६ अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये पिंजर येथील सात, दापूरा व मोठी उमरी येथील प्रत्येकी सहा, नागे लेआऊट येथील पाच, श्रावंगी प्लॉट, बार्शिटाकळी व रेडवा ता. बार्शिटाकळी येथील प्रत्येकी चार, कौलखेड, मलकापूर, गणेश नगर व रिंग रोड येथील प्रत्येकी तीन, खडकी, जवाहर नगर व पिंपळगाव चंभारे येथील प्रत्येकी दोन, आदर्श कॉलनी, आळंदा ता. बार्शिटाकळी, आगर, शिवनी, मुर्तिजापूर, खिक्रीयन कॉलनी, अन्वी मिजार्पूर, लहान उमरी, मरोडा ता. अकोट, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, जीएमसी, डाबकी रोड, जूने शहर, तुंलगा ब्रू. ता. पातूर, सुधीर कॉलनी, वृंदावन कॉलनी, बेलखेड ता. तेल्हारा, गौरक्षण रोड, जठारपेठ, गोरेगाव, दत्त कॉलनी, देवी खदान, योगी चौक, पारस, चान्नी, आरटीओ रोड व जामवसू ता. बार्शिटाकळी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ६४ जणांमध्ये दहिगाव येथील नऊ, डाबकी रोड व गौरक्षण रोड येथील प्रत्येकी सहा, कौलखेड, लहान उमरी व जूने शहर येथील चार, उमरी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी तीन, देशमुख फैल, सिसा ता. बार्शिटाकळी, खेमका सदन, गीतानगर, वाडेगाव, मोठी उमरी व राऊतवाडी येथील प्रत्येकी दोन, तोष्णीवाल लेआऊट, बालाजीनगर, महान, कळंबा, जीएमसी, दुगार्चौक, वडाळी देशमुख, जूना कपडा बाजार, माधव नगर, आळसी प्लॉट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
जुने शहर व चिखलगावातील दोघांचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा शुक्रवारी मृत्यू झाला. यामध्ये चिखलगाव येथील ७५ वर्षीय पुरुष व अकोल्यातील जुने शहरातील पोळा चौक भागातील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे ८ सप्टेंबर व ७ सप्टेंबर रोजी उपारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
१५९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४८, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ३५, उपजिल्हा रुग्णालयातून १०, आयकॉन हॉस्पीटल व ओझोन हॉस्पीटल येथून प्रत्येकी एक, कोविड केअर सेटर, बाळापूर येथून ४७, तर कोविड केअर सेंटर, बार्शिटाकळी येथून १७ अशा एकूण १५९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
१०९७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५२८९ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४०१७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १७५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १०९७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.