अकोला : अकोला जिल्हा व शहरात कोरोना साथीचे थैमान थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची व बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, ७ जून रोजी कोरोनामुळे अकोला शहरातील एकाचा मृत्यू, तर ५७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची नोंद घेण्यात आली. त्यामुळे मृतकांची एकूण संख्या ३७ झाली आहे. तर एकूण बाधितांचा आकडाही ८१३ वर गेला आहे.मे महिन्यापासून रुग्णवाढीच्या सत्राने वेग घेतला असून, महिनाभराच्या कालावधीत अकोला शहर कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून उदयास आला. शनिवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ७५६ होती. यामध्ये रविवारी ५७ रुग्णांची भर पडत हा आकडा ८१३ वर गेला. रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून एकूण १७६ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५७ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ११९ निगेटिव्ह आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात १८ महिला व २० पुरुष आहेत. यामध्ये आठ जण खदान येथील, चार जण अकोट फैल, चार जण तार फैल, चार जण खडकी, चार जण जीएमसी क्वार्टर येथील तर उर्वरित रजपुतपुरा, अंत्री मलकापूर, हरिहरपेठ, वाशीम रोड, छोटी उमरी नाका, द्वारका नगर मोठी उमरी, गजानन नगर, बापूनगर टेलिफोन कॉलनी, कैलास टेकडी, तपे हनुमान, देशमुख फैल, गायत्री नगर कौलखेड, ध्रुव अपार्टमेंट जिल्हा स्त्री रुग्णालया समोर आणि नायगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आज सायंकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व १३ पुरुष आहेत. त्यातील चार जण खदान येथील, तीन जण जठार पेठ येथील तर उर्वरित गोरक्षण रोड, कच्ची खोली सिंधी कॅम्प, अनिकट पोलीस लाईन, गवळीपुरा, दीपक चौक, शिवर, बलोदे ले आऊट, चैतन्य नगर, नायगाव, संत कबीर नगर, गुलजार पुरा आणि बाळापूर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.
रजपुतपुरा भागातील एकाचा मृत्यूदरम्यान, शनिवारी एका ८५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण रजपुतपुरा येथील रहिवासी असून , त्याला ३१ मे रोजी दाखल केले होते. या रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ३७ वर पोहचला आहे. एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येची नोंद आहे.
आणखी नऊ जणांना डिस्चार्जसायंकाळी नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातले पाच जणांना घरी तर चार जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात सात महिला तर दोन पुरुष आहेर. त्यातील देशमुख फैल येथील तीन जण तर गायत्रीनगर, कमला नगर, देवी खदान, सिटी कोतवाली जवळ, सोनटक्के प्लॉट व रामदास पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली. आतापर्यंत ५४० जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत २३६ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्राप्त अहवाल-१७६पॉझिटीव्ह-५७निगेटीव्ह-११९
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-८१३मयत-३७(३६+१),डिस्चार्ज-५४०दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२३६