अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. शनिवार, ६ जून रोजी दिवसभरात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, तर ३० नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यामुळे मृतकांचा आकडा ३६, तर एकूण रुग्णांची संख्या ७५६ झाली आहे. दरम्यान, आज दुपारी २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत १८९ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.अकोला विदर्भातील ‘हॉटस्पॉट’ ठरला असून, सद्यस्थितीत विदर्भात सर्वाधिक रुग्णांची नोंद अकोल्यात करण्यात आली आहे. शनिवारी दिवसभरात आणखी ३० रुग्णांची भर पडल्याने हा आकडा ७५६ वर पोहोचला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी वारी १०८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७८ अहवाल निगेटिव्ह आहेत. शनिवारी सकाळी प्राप्त अहवालात सात महिला व १३ पुरुष पॉझिटीव्ह आढळले आहेत. यामध्ये पाच जण सिंधी कॅम्प, पाच जण देवी खदान, काला चबुतरा येथील दोन, डाबकी रोड येथील दोन जण, तर ताज नगर, बलोदे ले-आउट, हरिहर पेठ, खदान, लकडगंज माळीपूरा व लेबर कॅम्प येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व सहा पुरुष आहेत. त्यात सिंधी कॅम्प येथील दोघे तर उर्वरित गंगानगर जुनेशहर, गुलजार पुरा, सोनटक्के प्लॉट, जेतवननगर खदान, भारती प्लॉट, गणेशनगर, व्यंकटेशनगर, जयहिंद चौक येथील प्रत्येकी एक रहिवासी आहेत.दरम्यान, शनिवारी दुपारी दोन जणांचा मृत्यू झाला. त्यातील एक जण ७० वर्षीय पुरुष असून हा रुग्ण गुलजार पुरा येथील रहिवासी आहे. हा रुग्ण ३ रोजी दाखल झाला होता. शनिवारी उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. तर दुसरी मयत ही ४० वर्षीय महिला असून, ती शरीफ नगर, जुने शहर येथील रहिवासी आहे. सदर महिलेला २७ मे रोजी दाखल करण्यात आले होते. तिचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आणखी २६ जणांना डिस्चार्जशनिवारी दुपारनंतर २६ जणांना डिस्चार्ज दिला. त्यातील आठ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित १८ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यात ११ महिला तर १५ पुरुष आहेर. त्यातील अकोट फैल येथील १०, खदान येथील पाच, रामदास पेठ येथील तीन तर देशमुख फैल, तारफैल, गायत्रीनगर, हरिहरपेठ, सोनटक्के प्लॉट, न्यू तारफैल, न्यू तापडीया नगर, जुल्फिकार नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.
१८९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआता सद्यस्थितीत ७५६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ३६ जण (एक आत्महत्या व ३५ कोरोनामुळे) मयत आहेत. तर आज २६ जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ५३१ झाली आहे. तर सद्यस्थितीत १८९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
प्राप्त अहवाल-१०८पॉझिटीव्ह-३०निगेटीव्ह-७८
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-७५६मयत-३६(३५+१),डिस्चार्ज-५३१दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१८९