लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भात बरे होणाऱ्या रुग्णांचे सर्वाधिक प्रमाण अकोला आणि अमरावती जिल्ह्याचे. तर दुसरीकडे बुलडाणा, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे.विदर्भात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले असून, त्यापैकी ८१.९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. नागपुरात सध्या १२,४६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपूरपाठोपाठ अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली; मात्र अमरावती जिल्ह्यातील कोरोनातून बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण ८३.२ टक्के आहे. हे प्रमाण विदर्भात सर्वाधिक असून, त्यानंतर अकोला जिल्ह्याचा क्रमांक लागतो. अकोल्यात कोरोनातून बरे होणाºया रुग्णांची संख्या ८२.८ टक्क्यांवर आहे. सप्टेंबर महिन्यात हेच प्रमाण ७० ते ७५ टक्क्यांवर आले होते.
अॅक्टिव्ह रुग्णांचे सर्वाधिक प्रमाण चंद्रपूर, वर्धेत! विदर्भात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळत असला, तरी काही जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. अमरावती, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली आहे; मात्र चंद्रपूर, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्येच्या ३९.९४ टक्के रुग्णांवर अजूनही उपचार सुरूच आहेत. यापाठोपाठ वर्धा, बुलडाणा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.