CoronaVirus : वन विभागाच्या राज्य नाक्यांवर अलर्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 09:57 AM2020-05-17T09:57:16+5:302020-05-17T09:57:47+5:30
जंगलांमधून जाणाऱ्यांवरही वॉच ठेवण्यात येत असून, जंगलात असलेल्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वन विभागाने उपाययोजना सुरू केली.
- सचिन राऊत
अकोला : वन विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या आरक्षित जंगलांमधून परप्रांतीय तसेच अनेकांची भटकंती होण्याचा धोका लक्षात घेता वन विभागाच्या राज्य नाक्यांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. जंगलांमधून जाणाऱ्यांवरही वॉच ठेवण्यात येत असून, जंगलात असलेल्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वन विभागाने उपाययोजना सुरू केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
वन विभागाच्या आरक्षित जंगलांमध्ये मुक्त संचार करीत असलेल्या वन्य प्राण्यांना कोविड-१९ या संसर्गजन्य विषाणूंचा धोका असल्याचे वन विभागाच्या लक्षात येताच वन विभागाच्या आरक्षित जंगलांमधील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यानंतर आता अनेक परप्रांतीय तसेच राज्यातील अंतर्गत गावांमध्ये पायी जाणाºयांनी काही जंगलांचा वापर सुरू केल्याचे वन विभागाच्या लक्षात आल्यानंतर या जंगलातील राज्य नाक्यांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जंगलात असलेल्या गावात कोरोनाचा शिरकाव होण्यास ब्रेक लावण्याचे काम वन विभागाच्या अधिकाºयांनी केले आहे. वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी तातडीने पावले उचलीत आरक्षित जंगलांमधील वन्य प्राण्यांना या संसर्गजन्य विषाणूपासून वाचविण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. याच आधारे आरक्षित जंगलांमध्ये असलेल्या राज्य नाक्यांवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासाठी वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांचा समावेश असलेले पथकच बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या बंदोबस्तात अलर्टचे कामकाज करीत आहेत.
एमपी, तेलंगना आंध्रप्रदेशच्या सीमा
राज्याला लागून मध्यप्रदेश, तेलंगना आंधप्रदेश, छत्तीसगड या राज्यांच्या सीमा असून, त्याला लागूनच मोठमोठी जंगले आहेत. या जंगलांमधूनच आता अनेकांनी प्रवास सुरू केल्याचे वास्तव आहे. त्यामुळे वन विभागाच्या जंगलातील राज्य नाक्यांवर अलर्ट जारी करून त्यावर नियंत्रण मिळविण्याचे काम सध्या वन विभागाच्या अधिकाºयांकडून करण्यात येत आहे. हरिसाल तसेच बैतुल या मार्गे मोठी जंगलं असल्याने मध्यप्रदेशातून येणारे अकोटमध्ये प्रवेश करीत असल्याची माहिती आहे.
जंगलातील रहिवाश्यांना क ोरोनाचा धोका कमी
राज्यातील वन विभागाच्या आरक्षित जंगलांमध्ये आजही अनेक गावे आहेत. या गावांमध्ये विकासाची गंगा पोहोचली नसली तरी कोरोना पोहोचण्याचा धोका होता; मात्र आता वन विभागाच्या अधिकाºयांनी जंगलात बंदोबस्त लावत नाक्यांवर अलर्ट जारी केल्याने या गावातील रहिवाश्यांना कोरोनाचा धोका कमी असल्याची माहिती आहे; मात्र स्थलांतरामुळे या रहिवाशांना धोका निर्माण होत असल्याचे लक्षात घेताच उपाययोजना सुरू केल्याने जंगलातील रहिवासी पुन्हा सेफ झोनमध्ये आले आहेत.