अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. बुधवार, १५ जुलै रोजी या जीवघेण्या आजाराने अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९८ झाली. तसेच आणखी २६ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १९३६ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी सकाळी २१७ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित १९१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी प्राप्त २६ पॉझिटिव्ह अहवालांमध्ये ११ पुरुष व १५ महिलांचा समावेश आहे. यापैकी साज जण अकोट येथील, पाच जण अकोट तालुक्यातील अकोली जहांगिर येथील, अकोल्यातील गोरक्षण रोड भागातील तीन जण, बाळापूर, मुर्तीजापूर व अकोल्यातील रजपूतपुरा भागातील प्रत्येकी दोन यांच्यासह चांदुर, बोरगाव मंजू, मोठी उमरी, मुर्तीजापूर तालुक्यातील धोत्रा शिंद आणि मुंडगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यूमुंडगाव येथील एका ७६ वर्षीय पुरुष रुग्णाचा बुधवार १५ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर रुग्णास १३ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांची प्रकृती अधिकच बिघडली व बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा ९८ वर गेला आहे. दरम्यान, आतापर्यंत १५९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्या २४५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
CoronaVirus : आणखी एकाचा बळी; २६ नवे पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा ९८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:19 PM
अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९८ झाली.
ठळक मुद्देआणखी २६ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १९३६ झाली आहे.सद्या २४५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.