शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
2
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
3
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
4
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
5
India vs Australia PM XI पिंक बॉल प्रॅक्टिस टेस्ट मॅचला 'वनडे' ट्विस्ट!
6
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
7
केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज
8
२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 
9
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
10
"हिंदी सिनेमा करु शकणार नाही असा विचार केला होता", अल्लू अर्जुनने प्रमोशनदरम्यान केला खुलासा
11
अनोखा आदर्श! नवविवाहित दाम्पत्याचा कौतुकास्पद निर्णय; ११ गरीब मुलांना घेतलं दत्तक
12
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
13
"त्याने मला बेडरुममध्ये बोलावलं..." प्रसिद्ध अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप; महिलेने केली तक्रार
14
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
15
IPL मधील युवा 'करोडपती' Vaibhav Suryavanshi सचिन-विराटला नव्हे तर या खेळाडूला मानतो आदर्श
16
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
17
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
18
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
19
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
20
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

CoronaVirus Cases : आणखी एकाचा मृत्यू, ४२७ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 2:45 PM

CoronaVirus Cases in Akola : शनिवार, २७ मार्च रोजी आणखी एकाचा मृत्यू झाल्याने एकूण कोरानाबळींचा आकडा ४४० झाला आहे.

अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडित होण्याची कोणतीही चिन्हे नसून, शनिवार, २७ मार्च रोजी आणखी एकाचा मृत्यू झाल्याने एकूण कोरानाबळींचा आकडा ४४० झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २४९, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये १८८ असे एकूण ४३७ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांचा आकडा २६,७८५ वर पोहोचला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १३८० अहवाल प्राप्त झाले. यापैकी २४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११३१अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील १५, बार्शीटाकळी येथील १३, डाबकी रोड व हिवरखेड येथील प्रत्येकी ११, तेल्हारा येथील १०, मोठी उमरी येथील नऊ, हिंगणी बु. येथील आठ, सिंधी कॅम्प, जठारपेठ व लहान उमरी येथील प्रत्येकी सात, देऊळगाव, कृषी नगर, राऊतवाडी व शास्त्री नगर येथील प्रत्येकी पाच, जीएमसी, गीता नगर, आदर्श कॉलनी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी चार, किर्ती नगर, मलकापूर देहगाव, बाळापूर, तोष्णीवाल लेआऊट व अकोट फैल येथील प्रत्येकी तीन, घुसर, रामदासपेठ, कारंजा राम, पातूर, धानोरा वैद्य, ताथोड नगर, गुडधी, खडकी, हिंगणा रोड, सावतवाडी, गोरक्षण रोड, बंजारा नगर, व्हिएचबी कॉलनी व आरोग्य नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित लोकमान्य नगर, फडके नगर, महात्मा फुले नगर, हामजा प्लॉट, गणेश नगर, राहनपूर, शहापूर, रुधडी, रुईखेड, पोपटखेड, केळीवेळी, नयागाव, पीकेव्ही, कान्हेरी सरप, शिवाजी पार्क, रिधोरा, चांगलवाडी, सिरसोली, खंडाला, खैरखेड, मेहकर, ताजनगर, सिव्हील लाईन, रेणूका नगर, दत्त नगर, क्रांती चौक्, बोरगाव, रतनलाल प्लॉट, सूकोडा, उरळ, वाडेगाव, मुर्तिजापूर, विरवाडा, जूनाराधाकिशन प्लॉट, शिवणी, लीगल टॉकीज, इकबाल कॉलनी, सिद्धार्थ नगर, लाईपुरा, शिवाजी नगर, तिलक रोड, आश्रय नगर, हरिहर पेठ, सोनाला, जवाहर नगर, तारफैल, भौरद, तापडीया नगर, दहिगाव गावंडे, कोठारी, एमआयडीसी, न्यु जैन टेम्पल, कुंभारी, आळसी प्लॉट, वृंदावन नगर, जूने शहर, पिंजर, कौलखेड, एमरॉल्ड कॉलनी, कपिलवास्तू नगर, गायत्री नगर, रचना कॉलनी, चांदणी पोलिस स्टेशन, हिंगणा, शिलोड सुकोडा, कोठारी वाटीका, आपातापा, खदान व केशवनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू

खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तेल्हारा येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला. या रुग्णास १६ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

 

६,८३७ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २६,७८५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १९,५०८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४४० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,८३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या