coronavirus : सर्दी, खोकला म्हणजे कोरोना नव्हे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 06:43 PM2020-03-11T18:43:25+5:302020-03-11T18:43:32+5:30
नागरिकांनी भयभित होण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
अकोला : अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे; परंतु हे आजार ऋतु बदलामुळे होणारे असून, त्याला कोरोना म्हणून नागरिकांनी भयभित होण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या सर्वत्र कोरोनामुळे धडकी भरलेली आहे. अशातच ऋतू बदलामुळे सर्दी, डोकेदुखी, खोकला तसेच तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, दवाखाने, रुग्णालये हाउसफुल्ल झाले आहेत. कोरोनाची लक्षणे म्हणून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे; परंतु सर्दी, खोकला आणि ताप म्हणजे कोरोना नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.
...तरच कोरोनाचा धोका
कोरोना विषाणूचा संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतरच कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा रुग्णाच्या संपर्कात येण्यापासून टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.