CoronaVirus : ‘सायलेंट कॅरिअर’पासून कोरोनाचा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 05:15 PM2020-04-27T17:15:39+5:302020-04-27T17:15:53+5:30
संभाव्य धोका टाळण्यासाठी फिजिकल डिस्टसिंग राखण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
अकोला : अनेकदा कोरोनाची लक्षणे दिसून येत नाही. शिवाय, ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली आहे, अशा रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे लवकर दिसून येत नाही. कोरोनाच्या अशा ‘सायलेंट कॅरिअर’ रुग्णापासून संभाव्य धोका टाळण्यासाठी फिजिकल डिस्टसिंग राखण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे; परंतु या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे माहिती होण्यापूर्वी ते सर्वत्र संचार करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे रुग्ण इतर व्यक्तींच्यादेखील संपर्कात आल्याने त्यांनाही कोरोनाची भीती सतावत आहे. अनेक रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्याने त्यांच्यातील कोरोनाची लक्षणे दिसून येत नाही. त्यामुळे एकापासून अनेकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर नियंत्रणासाठी कोरोनाची साखळी तोडण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी फिजिकल डिस्टसिंगचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
हे करा
घराबाहेर निघणे टाळा.
- कुठल्याही व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवा.
- नियमित मास्क किंवा रुमालचा वापर करावा.
- वारंवार साबणाद्वारे हात स्वच्छ धुवा.
- नाका-तोंडाला हात लावणे टाळा.
- सर्दी, खोकला किंवा ताप असल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवा.
- जवळच्या व्यक्तीमध्ये लक्षणे आढळताच आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.