Coronavirus: चांदुरात वऱ्हाडींना रोखले; शेतात भोजनाची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 02:10 PM2020-03-20T14:10:58+5:302020-03-20T14:11:04+5:30
काही मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत लग्न उरकण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना व्हायरसचे संक्रमण होउ नये यासासाठी राज्यभरात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. शहरी भागात या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशातच पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या मात्र मुळ अकोला शहरातील एका जोडप्याचा विवाह चांदूर येथे आयोजित करण्यात आला होता. याविषयी ग्रामस्थांना माहिती मिळताच वऱ्हाडींना गावाबाहेर थांबवण्यात आले. एवढेच नव्हे तर पोलिसांच्या मदतीने या वºहाडींना गावात प्रवेश नाकारण्यात आला. काही मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत लग्न उरकण्यात आले. तसेच वऱ्हाडींसाठी गावाबाहेर असलेल्या एका शेतात भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची सक्तीने अंमलजावणी करण्यात येत आहे.
पुणे शहरात कामानिमित्त वास्तव्यास असलेला वर व मुंबई येथे कार्यरत असलेली वधू या जोडप्याचा विवाह चांदूर येथील एका नातेवाइकाकडे आयोजित करण्यात आला होता. १९ मार्च रोजी हा विवाह होणार होता. याविषयी माहिती मिळताच ग्रामपंचायत प्रशासन तथा ग्रामस्थांनी याविषयी प्रशासनाला माहिती दिली. तसेच पोलिसांनाही माहिती देऊन वºहाड्यांना गावात प्रवेश देऊ नये अशी मागणी केली. त्यामुळे लग्न लावण्यासाठी गुरुवारी चांदुरात दाखल झालेल्या वºहाड्यांना पोलिसांनी गावाबाहेरच रोखले. तसेच त्यांना परत जाण्याचा आदेश दिला. काही मोजक्या वºहाडींच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. वºहाडासाठी गावाच्या बाहेर असलेल्या एका शेतात भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती; मात्र त्यातील अनेक वºहाडींनी आपआपल्या नातेवाइकांकडे आश्रय घेतला.